भारतामधील खाजगी व सरकारी नोकऱ्या वाढण्याचे प्रमाण, देशाच्या जीडीपी बरोबर नोकऱ्यांचे प्रमाण देखील वाढविण्याची मागणी

पुणे दिनांक डॉ. सतीश महामुनी

भारताचा वाढत चाललेला जीडीपी आणि आयुष्य कुठे लोकांना दर महिन्याला रेशन दुकानांमधून देण्यात येणारे धान्य वितरण त्याचबरोबर देशातील प्रचंड मोठ्या प्रमाणावर असलेली बेरोजगारी याचा ताळमेळ बसताना दिसत नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य जागतिक अर्थव्यवस्थेच्या भविष्याशी काही प्रमाणात जोडले गेले आहे जागतिकीकरण या प्रक्रियेचा हा एक भाग आहे देशाचा वाढत चाललेला जीडीपी दर यावर आगामी काळात मोठी चर्चा होणार आहे.

जगाचे सकल उत्पादन 2022 मध्ये 100 ट्रिलियन डॉलर एवढे होते त्यामध्ये अमेरिका युरोपीय महासंघ जपान आणि चीन यांच्या राष्ट्रांचामोठा वाटा आहे. जागतिक जीडीपी मध्ये या चार राष्ट्रांचा खूप मोठा वाटा आहे. जवळपास 70 टक्के जीडीपी या चार राष्ट्राच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. भारत ब्राझील रशिया दक्षिण आफ्रिका इंडोनेशिया या विकसनशील देशांच्या उत्पन्नाचा पंधरा टक्के परिणाम जागतिक जी डी पी झालेला आहे. जागतिक पातळीवर भारताचा जीडीपी वाढणे हे भुवया उंचावण्यासारखे आहे. जगातील प्रमुख राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था फारशा वाढणार नसताना भारताची अर्थव्यवस्थेतील तेजी भारताचे या कालावधीतील वेगळेपण सांगून जाते आहे.

भारताचा वाढत चाललेला जीडीपी हा जरी एका बाजूला समाधान दाखवणार असला तरी भारतातील बेरोजगारी संपवण्यामध्ये मात्र अद्याप पर्यंत केंद्र सरकारला यश प्राप्त झालेले नाही खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येक राज्यांमध्ये असणारी बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक राज्यांमध्ये सरकारी नोकरी आणि खाजगी नोकऱ्या वाढल्या पाहिजेत त्याशिवाय ही बेरोजगारी कमी होणे शक्य नाही आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून जीडीपी आणि इतर दिसणाऱ्या बाबी समाजासमोर आणि प्रसारमाध्यमांमध्ये मांडल्या जात आहेत परंतु वाढत चालल्या जीडीपी चा प्रत्यक्ष दारिद्र्यामध्ये जगणाऱ्या किंवा नोकरीसाठी फिरणाऱ्या तरुणांना किती फायदा होतो हा देखील संशोधनाचा विषय आहे.

एका बाजूला केंद्र सरकार देशातील 80 कोटी कुटुंबांना अल्प दरामध्ये धान्य वाटप करत आहे कोरोनाच्या कालावधीत मोफत धान्य वितरण झाले आहे त्याचीच मालिका पुढे देखील सुरू आहे जर देशाचा जीडीपी मोठ्या प्रमाणावर वाढत चालला असेल तर लोकांना मोफत अन्न वाटण्याची काय गरज आहे याचा विचार देखील झाला पाहिजे. सरकार कोणाचे असो सरकारकडून धोरणात्मक निर्णय घेतले गेले पाहिजेत लोकांना खुश करण्याच्या अनुषंगाने आणि मतदान समोर ठेवून सरकार काम करणार असेल तर देशाचा विकास होणे शक्य नाही.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2014 नंतर परदेशामध्ये फिरून भाषणे करून परकीय गुंतवणूक भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांच्या त्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळाला प्रत्येक राज्यांमध्ये नव्याने मागील आठ वर्षांमध्ये किती कंपनी निर्माण झाली रोजगार किती निर्माण झाला याचा देखील हिशोब मानला गेला पाहिजे जीडीपी वाढला हे खूप चांगले आहे परंतु त्याचबरोबर बेरोजगारी कमी झाली पाहिजे आणि उद्योगाची उभारणी झाली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *