Manoj jarange patil मनोज जरांगे पाटील यांनी इतिहास घडवला, मराठा आरक्षणाची लढाई आली अंतिम टप्प्यात, पंधरा दिवसापासून राज्य सरकार जरांगे पाटील यांच्या मनधरणीत मग्न maratha reservetion

बीड / तुळजापूर दिनांक 12 डाॅ.सतीश महामुनी

आरक्षणाचा चळवळीमध्ये मागील पंधरा दिवसापासून महाराष्ट्राच्या केंद्रबिंदू असणारे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी घेतलेल्या भूमिकेनंतर मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकार गंभीर झाल्याचे दिसून आले मागील तीन दिवसापासून सुरू असलेली बोलणी दरम्यान माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केलेली शिष्टाई त्याचबरोबर समाजसेवक भिडे गुरुजी यांचे मनोज जरांगे पाटील यांची घेतलेली भेट या सर्व घटनांकडे लक्ष वेधले असतात आगामी एक महिन्यांमध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

छत्रपती संभाजी महाराज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर खूप मोठी जबाबदारी पुढच्या काळात राहणार आहे मराठा समाजाची अनेक वर्षापासून ची आरक्षणाची मागणी मागील पाच वर्षांमध्ये अधिक तीव्र झालेली आहे 58 मराठा समाजाचे निघालेले विराट मोर्चे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आजपर्यंत वेगवेगळ्या नेतृत्वाने केलेली वेगवेगळी आंदोलने याशिवाय मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करणाऱ्या विद्यार्थी संघटना तसेच वेगवेगळ्या सामाजिक राजकीय पक्षांची भूमिका आज पर्यंत महाराष्ट्राने पाहिली आहे परंतु न्यायालयीन लढाया मध्ये हरलेले मराठा आरक्षण पुन्हा जिंकण्याची आव्हान मात्र कोणीही पार केलेले नाही हे वास्तव लक्षात घेऊन मागील पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान झालेल्या लाठीचार्ज घटनेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक कळीचा मुद्दा ठरला आहे महाराष्ट्राचे राजकारण समाजकारण याच्या केंद्रबिंदू म्हणून मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे आले आहेत

अमरण उपोषण मागे घेण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वेगवेगळ्या नेतृत्वाने आणि उपोषण स्थळी असलेल्या इतर सहकाऱ्यांनी आपणास शासनाला एक महिना मुदत देण्याची चर्चा केली आहे आमरण उपोषण मागे घेण्याचा निर्णय हा समाजाचा आहे आणि मी समाजाच्या पुढे जाणार नाही मराठा समाज जो निर्णय मला सांगेल तो मान्य करून मी दोन पावले मागे घेतो आहे केवळ आणि केवळ माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आता ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे त्यामुळे यामध्ये कोणतीही बाधा आली नाही पाहिजे व गोरगरीब मराठा समाजाला हे कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण दिले गेले पाहिजे अशी मानसिकता माझ्या मनामध्ये आहे मी आज आमरण उपोषण जरी मागे घेत असलो तरी पुढील एक महिना हे साखळी उपोषण याच ठिकाणी चालू राहील या काळात मी माझ्या घरी वापस जाणार नाही आणि हे साखळी उपोषण आणि हे मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरूच राहणार आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र 30 दिवसानंतर मिळालेच पाहिजे ते 31 व्या दिवशी मराठा समाजाच्या तरुणाच्या हाती पडलेच पाहिजे या आरक्षणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानसभेतील सत्ताधारी आणि विरोधक यांनी घेतलेल्या बैठकीचा उल्लेख करून मनोज जरांगे पाटील म्हणाले की सर्वपक्षीय राजकीय सहमती हे देखील मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाचे मोठे फलित आहे सर्व राजकीय पक्षांना जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर पुढचे 30 दिवस कशासाठी हवे आहेत जे काम एक दिवसात करता येईल त्यासाठी 30 दिवस कशासाठी मागत आहात असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे

मी घरी वापस जाणार नाही आणि आंदोलन देखील सुरू राहील हे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला या आंदोलनाच्या वर्तुळामध्ये बांधून ठेवणारी आहे आंदोलनाची धग कमी झाली नाही पाहिजे, आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसायचे नाही हा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे अनेक वर्षापासून सुरू असलेली ही लढाई जिंकण्याची वेळ आली आहे आता एक तर आरक्षणाची विजयी यात्रा काढायची अन्यथा माझी अंत्ययात्रा निघेल अशा निर्वाणीच्या शब्दांमध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सामान्य कुटुंबातील मराठा तरुण म्हणून गोरगरीब मराठ्यांचे प्रतिनिधित्व करणारे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक वर्षापासून संघर्ष करणारे संघर्ष करते म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे महाराष्ट्रातील सर्व तरुण मंडळी बघता आहेत आणि त्यांनी देखील आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका या पंधरा दिवसाच्या काळात बजावली आहे अनेक आंदोलनाची उदाहरणे पाहिल्यानंतर गरीबाचा नेता किंवा आपल्या समाजाला गरिबीतून वर काढण्यासाठी लढणारा लढवय्या कार्यकर्ता कसा असला पाहिजे याचे उदाहरण मनोज जरांके पाटील यांनी आपल्या आमरण उपोषणांमधून घालून दिले आहे जास्तीचे न बोलता आरक्षणाचा विषय मोजक्या शब्दांमध्ये मांडून लोकशाही मार्गाने मनोज जरांगे पाटील यांनी या आरक्षणाच्या लढाईला अंतिम टप्प्यात आणून ठेवले आहे .

या लढाईतील ते प्रमुख शिलेदार बनले आहेत अनेकांची नावे या लढाईमध्ये घेतली जातील परंतु लढाईला यशाची किनार दाखवणारे नेते म्हणून निश्चितच भविष्यामध्ये मनोज जरांगे पाटील हेच असतील असे आजचे वातावरण आहे.

पुढारी न्युज आरक्षण चर्चासत्र तुळजापूर

पुढारी न्युज चैनल च्या वतीने तुळजापूर येथे आरक्षणाची परिषद संपन्न झाली मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्यसमन्वयक सज्जनराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या सभेमध्ये अनेक मराठा आरक्षण अभ्यासकांनी आपली भूमिका मांडली यामध्ये जीवन राजे इंगळे, किशोर गंगणे, नागनाथ भांजी ,आबासाहेब कापसे ,प्राध्यापक रमेश ननवरे, अजय साळुंखे, प्राध्यापक रामलिंग थोरात प्राध्यापक अमर भरगंडे अर्जुन आप्पा साळुंखे, महेश गवळी, कुमार टोले इंद्रजीत साळुंखे, शिवाजी बोधले, किशोर पवार, महेश चोपदार, संजय जाधव, सचिन ताकमोगे, अशा विविध युवक नेत्यांनी तुळजापूरच्या या आरक्षण चर्चासत्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका ठामपणे मांडली.

अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी झुंजुतो आहे कष्ट करणारा आणि गरीब परिस्थितीमध्ये जीवन जगणारा मराठा समाज जर आरक्षण मागणी करत असेल तर त्याला ते का देऊ नये घटनेने मराठा समाजाला दिलेला हा अधिकार असताना तो का डावला जातो आहे राजकीय हेवेदावे आणि राजकीय श्रेयवादामध्ये मराठा आरक्षण आजपर्यंत झुंजत राहिले आहे राजकारणापेक्षा आम्हाला मराठा आरक्षण मोलाचे आहे महत्त्वाचे आहे मराठ्यांच्या पोरांना आरक्षण दिले तर मराठा समाजाची गरिबी दूर होईल अशी साधी भावना या सर्व व्यक्तींनी याप्रसंगी बोलून दाखवली या सर्व परिषदेमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्यसमन्वयक सज्जन राव साळुंखे यांनी समन्वयाचे आणि आरक्षण कोणत्या पद्धतीने दिले गेले पाहिजे अशा विविध पैलवर त्यांनी आपली भूमिका मांडली प्राध्यापक रमेश नन्नवरे यांनी दोन राजे महाराज आणि सीएम व दोन डेप्टिशियम यांना मनोज जडांगे पाटील यांनी जी अट घातलेली आहे त्यामागे मराठा समाजाचा व्यापक अर्थ दडलेला आहे या जरांगे पाटील यांच्या भावना सरकारने ओळखून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्राच्या तमाम मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे हे आमरण उपोषण खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय देणारे ठरणार आहे अशा शब्दात प्राध्यापक ननवरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा गौरव केला.

आरक्षणाच्या मुद्द्यावर किशोर गंगणे आणि नागनाथ भांजे यांनी इतिहासातील संदर्भ देऊन मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावे अशी भूमिका मांडली. महेश चोपदार आणि महेश गवळी या दोन नेत्यांनी घटनात्मक बाबीचा आणि केंद्र सरकारच्या जबाबदारीची माहिती या चर्चासत्रात सांगितली अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर वटहून काढला जातो केंद्र सरकार अशा हुकमाच्या आधारे सरकार चालवते मग मराठा आरक्षणाच्या विषयावर अशा प्रकारचा वटहुकूम काढण्याचा प्रयत्न आजपर्यंत का केला गेला नाही असा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकार आणि राज्य सरकारची आरक्षण संदर्भातील भूमिका वेळ काढणारी आहे असा ठपका ठेवला असल्याची

एखादा समाज मागणी न करता त्याला आरक्षण दिले जाते असा मुद्दा प्राध्यापक रामलिंग थोरात यांनी उपस्थित करून किती वर्षे मराठा समाजाने आंदोलन करायचे जगायचे की केवळ आंदोलन करण्यामध्येच आपले आयुष्य घालवायचे असा भावनिक मुद्दा त्यांनी उपस्थित केला याप्रसंगी किशोर पवार यांनी मराठा समाज सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा समाज आहे आज त्याच्यावर आरक्षण मागण्याची वेळ का आली आहे याचा सर्वांनीच अभ्यास केला पाहिजे असा मुद्दाम उपस्थित केला या चर्चासत्रामध्ये अर्जुन आप्पा साळुंखे नरसिंग बोधले इंद्रजीत साळुंखे यांनी देखील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी राज्य सरकारकडे मागणी केली. प्रसन्न जोशी यांनी या पुढारी न्यूजच्या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले पुढारी टीम मधील भीमाशंकर वाघमारे दादासाहेब चव्हाण डॉक्टर सतीश महामुनी आणि प्रवीण पवार पत्रकार श्रीकांत कदम पत्रकार गोविंद खुरुद यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *