मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन.
मुंबई दि.१७: मराठवाडा मुक्तीसंग्रामत हजारो लोकांनी जीवन समर्पित केलं आहे. निजामाच्या जुलमी राजवटीपासून मराठवाड्याला पुरोगामी विचाराकडे नेण्याचं काम सन्माननीय वल्लभभाई पटेल तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील नेते स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, आर्य समाजाचे कार्यकर्ते यांसह महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
मराठवाड्यातील हुतात्म्यांना अभिवादनाचा ठराव आणि त्याच्या विकासाकरताचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेले आहेत.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मृतींना अभिवादन करताना आगामी काळात मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी आणि तिथे शाश्वत उद्दिष्टे राबविली जावीत अशी अपेक्षा उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.