महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तुळजाभवानी चरणी नतमस्तक

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना .राधाकृष्ण विखे ( पाटील ) हे आई तुळजाभवानीच्या दर्शनाकरिता तुळजापूर येथे आले होते . प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा सुपरवारीयर मराठवाडा सहसमन्वयक ऍड अनिल काळे यांनी त्यांचे स्वागत केले.

धाराशिव जिल्ह्यातील वर्ग दोन च्या जमिनी वर्ग १ करण्यासंदर्भात चर्चा केली, त्यांनी याबाबत आपण समिती स्थापन करून या संदर्भातील अहवाल मागून घेतला जाईल आणि तो अहवाल आल्यानंतर त्याबाबत आपण सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना दिले. याप्रसंगी मंत्री महोदयां सोबत प्रवीण परदेशी व ऍड अनिल काळे व इतर सहकाऱ्यांसोबत बैठक झाली असल्याचे या विषयाच्या अनुषंगाने मंत्री महोदयांना सांगण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, भाजप प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे, तीर्थक्षेत्र विकास समितीचे माजी सदस्य विकास मलबा, भाजपा शहराध्यक्ष शांताराम पेंदे व इतर सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *