धीरज पाटील व देवानंद रोचकरी यावेळी विधानसभेच्या रिंगणात, पुन्हा एकदा मधुकरराव चव्हाण यांच्याकडून लढण्याची आणि विजयी होण्याची मानसिकता
तुळजापूर दिनांक २८ डॉ. सतीश महामुनी यांजकडून
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या वतीने अशोक जगदाळे यांनी दमदार उमेदवारीची मागणी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करून आपल्या विधानसभा उमेदवारीची घोषणा केल्याचे दिसून आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे हे मोठे उद्योजक आहेत नळदुर्ग नगरपरिषद त्यांच्या ताब्यात आहे. यापूर्वी तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना खाजगी तत्त्वावर चालविण्यास त्यांनी घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत देखील त्यांचा संबंध आला आहे. तुळजाभवानी साखर कारखान्याच्या त्यांच्या कारकीर्दी बाबत उलट सुलट चर्चा असली तरी कारखाना चालविण्यास घेण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले हे देखील तुळजापूर तालुक्याच्या कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाची बाब आहे. नळदुर्ग नगरपरिषद स्वबळावर ताब्यात आणून त्यांनी आपले संघटन कौशल्य आणि निवडणूक जिंकण्याचे तंत्र आपल्याजवळ आहे हे सिद्ध केले आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी जे नाव कमावले आहे त्या नावाची कीर्ती सर्व राज्यभर आहे नरेंद्र मोदी आणि शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबई येथील एका कार्यक्रमात उद्घाटन निमित्ताने घेतलेल्या छायाचित्रांमध्ये अशोक जगदाळे यांनी आपले स्थान दाखवले आहे. राजकारणामध्ये चांगली उंची असल्याशिवाय यशस्वी होता येत नाही हे समीकरण आहे कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा याला खूप मोठे महत्त्व आहे या पातळीवर अशोक जगदाळे हे राजकारणामध्ये यशस्वी व्यक्ती आहेत. जनमानसामध्ये आपली प्रतिमा निर्माण करण्यामध्ये आणि सेवा प्रकल्प राबवल्यामध्ये ते आघाडीवर असून वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी आपली संघटन शक्ती दाखवून दिली आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची सदस्य होणे त्याचबरोबर यापूर्वी वंचित आघाडी कडून तुळजापूर विधानसभा निवडणूक लढवून लक्षवेधी मतदान प्राप्त केले आहे. यापूर्वी त्यांनी विधानपरिषद निवडणूक देखील दणक्यात लढवली होती आणि तेथे त्यांना दगा फटक्याच्या राजकारणाचा फटका बसला त्यामुळे ते पराभूत झाले आहेत. अशोक जगदाळे या निवडणुकीत विजयी झाले असते तर राणा जगजितसिंह पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी आले नसते. या तालुक्यामध्ये ती विधान परिषदेची निवडणूक मैंलाचा दगड ठरली आहे. या निवडणुकीत विजय झाला असता तर मधुकरराव चव्हाण आणि अशोक जगदाळे यांची एकत्र ताकद तालुक्याला अनुभवता आली असती परंतु तसे होऊ शकले नाही .
तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अशोक जगदाळे यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे चित्र आहे. राज्य पातळीवर जरी अशोक जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपले स्थान प्राप्त केले आहे परंतु तुळजापूर तालुक्यातील तालुका पदाधिकारी मात्र त्यांच्याबाबत समाधानी नसल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी असली तरी या सामान्य तालुका पदाधिकारी यांना विश्वासात घेणे अशोक जगदाळे यांना का जमले नाही असा प्रश्न आहे.
अशोक जगदाळे हे उच्चशिक्षित आहेत राजकारणामध्ये वावरण्याची आणि यशस्वी राजकारण करण्याची संभाषण कला त्यांच्याकडे अवगत आहे उत्तम विकासाची दृष्टी असणारा नेता म्हणून देखील ते प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडून चांगली विकास कामे होतील अशी लोकांची अपेक्षा देखील आहे नळदुर्ग नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी जे यश प्राप्त केले आहे त्या तुलनेमध्ये नळदुर्ग शहराचा विकास हा देखील निवडणुकीसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे.
लोकांच्या अपेक्षा खूप आहेत मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण त्याचबरोबर धनगर आरक्षण असे मुद्दे राजकारणामध्ये निर्माण झालेले आहेत. शेतकऱ्याचे प्रश्न निवडणुकीमध्ये प्रचाराचे प्रमुख मुद्दे होत आहेत. तुळजापूर तालुक्याचा विकास आजपर्यंत कसा झाला आणि तुळजापूर तालुक्याच्या विकासामध्ये जनतेची काय अपेक्षा आहे या विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या भाषणामध्ये खूप चांगले वर्णन केले आहे आपण तुळजापूर तालुक्याच्या विकासाला चांगला आकार देऊ शकतो तरुण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी चांगले उपक्रम प्रकल्प आणू शकतो
राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी खूप करता येण्यासारखे काम आहे अनेक वर्षापासून तुळजापूर तालुका विकास कामापासून वंचित राहिला आहे केवळ आपला आमदार आणि खासदार निधी खर्च करणे यालाच विकासाची कामे म्हणतात का असा प्रश्न विचारून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ग्रामीण भागाच्या विकासासाठी सोसायटी आणि इतर शासकीय योजना यांचा उपयोग केला आहे त्याचा आपण वापर करून प्रत्येक गावाला बळकट करण्याचे काम करून असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवला. सरकार म्हणून काम करत असताना पक्ष बाजूला ठेवून प्रत्येक गावाला बळकट करण्याचे काम केल्याशिवाय तालुका बळकट होत नाही हे साधे सूत्र देखील राज्यकर्त्यांना कळत नाही नको त्या गोष्टी करून केवळ पाच पाच वर्ष वाया जात आहेत यामध्ये तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास हा खूप जलद गतीने झाला पाहिजे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये अनेक तीर्थक्षेत्र विकासापासून वंचित आहेत त्याला देखील विकसित करण्यासाठी राज्यकर्त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी साखर कारखाने आहेत परंतु ते शेतकऱ्याला न्याय देतात का त्यांनी शेतकऱ्याला योग्य न्याय देण्याच्या अनुषंगाने काही सहप्रकल्प राबविले पाहिजे ते सहप्रकल्प राबवण्यासाठी या साखर कारखान्यांना सरकारकडून मिळवून देण्याची क्षमता आमदाराने खासदारांमध्ये असली पाहिजे आणि असे सक्षम लोकप्रतिनिधी होण्याच्या अनुषंगाने आपण स्वतः इच्छुक झालो आहोत मनामध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगले काम करण्याची इच्छा आहे सामान्य माणसाला आर्थिक दृष्ट्या प्रबळ करण्यासाठी अत्यंत लहान लहान गोष्टी मधून खूप चांगले काम करता येते हे काम करण्याची दृष्टी आणि कोणत्या गावाला काय दिले पाहिजे याचे भान आपल्याजवळ आहे माझ्यासोबत जे लोक काम करतात त्यांना अशोक जगदाळे समजलेला आहे परंतु सत्तेचा एखादा पद मिळाल्याशिवाय सर्व समाजाला कामांमध्ये सहभागी करता येत नाही हे देखील तेवढेच वास्तव आहे आपण सर्वजण मिळून तुळजापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करूयात अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त केले खूप मोठ्या प्रमाणावर वाढदिवस साजरा करून शेकडो लोकांनी त्यांचा या दिवशी सत्कार केला नळदृग शहरांमध्ये दिवाळी साजरी व्हावी अशा प्रकारे अशोक जगदाळे यांचा वाढदिवस साजरा झाला तुळजापूर शहरांमध्ये देखील त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक डिजिटल बोर्ड लावले गेले होते आणि त्यामुळे ते विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत अस संदेश विधानसभा मतदारसंघात पोहोचला आहे.