तुळजापूर दिनांक १५ प्रतिनिधी
तालुका तुळजापूर येथे काँग्रेस कार्यकर्त्याची बैठक मधुकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली त्यावेळी बोलताना मधुकरराव चव्हाण म्हणाले की, या भागातील साठवण तलाव रस्ते सुधारणा वीजपुरवठ्याचे जाळे मी माझ्या काळात करू शकलो. त्यामुळे या भागामध्ये द्राक्षे, ऊस, भाजीपाला, कांदे, या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन या भागामध्ये सुबत्ता येऊ शकली. तुम्ही मला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यामुळे मी हे करू शकलो त्याचबरोबर ह्या भागामध्ये मिनी एमआयडीसी सुरू झाली त्यामुळे या भागातील सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळू शकलो .
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर आणखी काही कामे करण्याची शिल्लक आहेत. मागील 5 वर्षांमध्ये कोणतीही विकास कामे झाली नसल्यामुळे तालुका 10 वर्षे मागे गेला कृष्णा खोरेचे पाणी येऊ शकले नाही. रस्त्याची दयनीय अवस्था आहे. कृष्णाखोरेचे पाणी आल्यानंतर राहिलेला कोरडवाहू भाग बागायती होऊन शेतकरी व शेतमजुरांच्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे. त्यासाठी येणाऱ्या विधानसभेत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मी पुन्हा एकदा उभा राहणार आहे. त्यासाठी मला सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती केली.
यावेळी अध्यक्ष स्थानी मगर गुरुजी होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये काँग्रेसचे नेते रसिक वाले ,माजी सभापती शिवाजी गायकवाड , काँग्रेस नेते ऋषिकेश मगर, तामलवाडी चे उपसरपंच सुधीर पाटील, डॉ. रविकांत गुरव ,हमीद पठाण हणमंत गवळी, मसुते बालाजी चुंगे बालाजी खराबे पोपट कदम राम कदम सतीश मगर हरी पैलवान मगर बंटी गवळी सुनील नकाते गजेंद्र बोचरे अण्णा बु तालुका तुळजापूर येथे काँग्रेस कार्यकर्त्याची बैठक मधुकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न आरळी मधून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा गावकऱ्यांचा संकल्प
दिनांक 14 सप्टेंबर रोजी आरळी बु तालुका तुळजापूर येथे काँग्रेसची बैठक मधुकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मधुकर राव चव्हाण यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्यांनी संकल्प केला.
माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ बंडगर यावेळी बोलताना म्हणाले की या भागातील रस्ते, साठवण तलाव, पिण्याच्या पाण्याची योजना, शाळा इमारत बांधकाम, दवाखान्यासाठी केलेले प्रयत्न याची जाणीव सर्व गावकऱ्यांना आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मधुकरराव चव्हाण यांना या भागातून सर्वाधिक मताधिक्य आरळी मधून देणार असल्याचे सांगितले. यावेळी गावचे सरपंच किरण वर्क दादाराव पारवे भीमराव सोनवणे प्रभाकर
उळेकर मकरंद बामणकर फारुख शेख जीवन ज्योत पापालाल सय्यद बजरंग कोकाटे महावीर पौळ रामभाऊ पारवे हरि सोनवणे बाबासाहेब भोसले प्रकाश तानवडे मोहम्मद शेख श्रीमंत कदम दस्तगीर शेख खाजाभाई शेख शहाजी यादव बब्रुवान भोसले गोकुळ यमगर अरुण हाके अरूण ज्योत यांचे सह माजी बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे, माजी सभापती शिवाजी गायकवाड, एडवोकेट रामचंद्र ढवळे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन ज्योत आणि केले तर आभार प्रदर्शन मकरंद बामनकर यांनी केला.
तामलवाडी येथे माजी पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड यांनी बोलताना तामलवाडी पंचायत समिती मतदार संघामध्ये सहा गाव येतात या सहा गावांमध्ये बारा साठवण तलाव काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत. या परिसराचा कायापालट करण्याचे काम मधुकरराव चव्हाण यांच्या कार्यकर्तुत्वामळे झालेले आहे हे सर्व मान्य आहे विरोधक देखील हे मान्य करतात त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी बक्कम आणि दमदार उमेदवार केवळ माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हेच आहेत याची जनतेला देखील जाणीव झाली आहे असे सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे नेते हनुमंत गवळी यांनी देवपुरी गावाच्या तीन बाजूला तीन साठवण तलाव माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नांनी झालेले आहेत. आम्ही स्वप्नात देखील एवढे पाणी पाहिले नव्हते ते केवळ चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला मिळालेले आहे आमच्या अनेक पिढ्या मधुकरराव चव्हाण साहेब यांना विसरणार नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2000 मतदान करून आम्ही आमचा प्रामाणिकपणा सिद्ध करू असे सांगितले.
माजी मंत्री व काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाण यांचा ग्रामीण भागाशी खूप मोठा संबंध आहे सुमारे 60 वर्षापासून ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच एकनिष्ठ आहेत त्यांचा सामान्य मतदाराशी असलेला जिव्हाळा आणि गाव पातळीवर केलेली विकास कामे लोकांच्या अडीअडचणी तसेच व्यक्तिगत जीवनामध्ये केलेली मदत यामुळे मागील पाच वर्षांमध्ये विरोधी आमदार राहिल्यामुळे या सगळ्या लोकांमध्ये मधुकरराव चव्हाण यांच्या बद्दल मोठी सहानुभूतीची लाट या मतदारसंघात आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे उमेदवार असतील तर कोणताही पक्ष पार्टी न पाहता त्यांना उत्स्फूर्तपणे मतदान होईल आणि ते निश्चित विजयी होतील असा विश्वास ग्रामीण भागातील प्रत्येक काँग्रेसने त्यामध्ये दिसून येत आहे.