शुक्रवार पेठ श्रीकांत घोडके घराशेजारी कार्यक्रम आयोजन
तुळजापुर दि 3 प्रतिनिधी
तुळजापूर येथे 22 जानेवारी आयोध्या येथील राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या संत महंतांचा सत्कार समारंभ 4 फेब्रुवारी 2024 रविवार रोजी तुळजापुरात संपन्न होत असून याप्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक श्रीकांत घोडके यांनी केले आहे. अयोध्या राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना हा आपल्या जीवनातील अत्यंत मोलाचा ऐतिहासिक क्षण ठरला आहे या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी तुळजापूर येथील महंत निमंत्रित होते आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दिलेली आहे या कृतीर्थ या सर्व मान्यवरांचा श्रीकांत घोडके परिवाराच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
आयोध्या येथील राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना करण्याच्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सद्गुरु गुरुबाबा औसेकर महाराज, पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर, महंत तुकोजी महाराज, महंत योगी मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज यांचा सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन 4 फेब्रूवारी रविवार रोजी शुक्रवार पेठ येथे सायंकाळीं 6.00 वाजता करण्यात आलेले आहे याप्रसंगी परिसरातील भावीक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक श्रीकांत घोडके यांनी केलेले आहे.
या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांचे सहअध्यक्ष आणि औसा संस्थांनचे संत सद्गुरु सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे याप्रसंगी परिसरातील सर्व नागरिकांनी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.