लोकप्रिय शिक्षिका श्रीमती शकुंतला माणिकराव देशमुख यांचे निधन

तुळजापूर दि 16 डाॅ.सतीश महामुनी

श्रीमती शकुंतला माणिकराव देशमुख ( वय 85 ) यांचे राहत्या घरी शुक्रवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्या कै. माणिकराव गणपतराव देशमुख ( आजीवसेवक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था )यांच्या पत्नी होत्या. त्या शिंदे हायस्कूल येथील शिक्षिका होत्या शालेय उपक्रमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांनी त्यांच्या शिक्षणाला मदत करुण प्रोत्साहन दिले. तुळजापूर येथील मुलींच्या शिक्षणात त्यांचा मोठा वाटा होता. त्याच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, दीर, भावजय, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *