मुंबई दिनांक 18 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते पदावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपलाच गट मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असे कारण देऊन महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार झाले तेव्हा हा राजकीय डावपेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने झाला असेल असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता अनेक राजकीय तज्ञांनी याला दुसरा दिला होता परंतु बीड येथे शरद पवारांनी केलेले शक्ती प्रदर्शन पाहता आगामी काळात शरद पवार आणि अजित पवार यांच्या मधला राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार हे नक्की झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेला हापापलेल्या नेत्यांना दूर करून पक्षावर आणि पुरोगामी विचार तसेच आपल्या स्वतःला मानणाऱ्या लोकांना सोबत घेऊन पक्ष चालवण्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच हा राजकीय डाव खेळला का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही बातमी वाचणाऱ्या वाचकांनी शरद पवार यांच्या महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया व्हाट्सअप वरती द्यावी त्याला पुढील तीन दिवसांमध्ये प्रसिद्ध दिली जाईल एका पेक्षा जास्त लोकांची मते एकत्र करून ती न्यूज मराठवाड्याच्या माध्यमातून सर्वांना वाचण्यासाठी दिली जाते. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार यांचे नवे राजकीय डावपेच तसेच भारतीय जनता पार्टीच्या अलीकडच्या काळातील इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेऊन मंत्रिपदे देण्याच्या योजनेसंदर्भात आपल्या प्रतिक्रियेमध्ये सविस्तर लिहावे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काय राजकीय चित्र राहील कोण सत्तेवरती येईल आणि कोण विरोधामध्ये बसेल अशा वेगवेगळ्या विषयांचा तुमच्या प्रतिक्रियेमध्ये समावेश असावा . 9890024910 या व्हाट्सअप क्रमांकावर आपल्या प्रतिक्रिया कळवा.
अजित पवार आणि त्याच्यासोबत अन्य आठ नेत्यांनी मंत्री पद स्वीकारले पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विवरचनेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीसह अजित पवार सापडले आणि 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा पडद्यामागे लपला. पहाटेचा शपथविधी झाल्यापासून बेचैन असणारे फडणवीस अजित पवार यास सत्ता काळात मात्र हसू लागले आहेत या त्यांच्या राजकीय वाटचालीकडे जनता देखील तेवढाच सूक्ष्मपणे पाहते आहे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपर्यंत राजकीय नीतिमत्ता आणि राजकीय विचार पायदळी तुडवून कोणीही अशा प्रकारचे कृत्य किंवा कारवाया केलेल्या नाहीत शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना दिलेला राजकीय धोका तसेच वसंतदादा पाटील यांना शरद पवार यांनी केलेला विरोध अशा भूतकाळातील गोष्टी आज शरद पवार यांना त्यांच्या विरोधकाकडून बोलल्या जात आहेत यामध्ये शरद पवार यांना देखील महा गद्दार असा शब्द उपयोग करण्याची स्पर्धा लागली आहे.
2014 मध्ये केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यानंतर भारतीय जनता पार्टीने इतर पक्षातील नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश देऊन किंवा कोणत्याही प्रकारे सत्ता स्थापन करायची म्हणून केलेली राजकीय चतुराई आणि पक्ष फोडाफोडीचे राजकारण याचा खूप मोठा परिणाम जनमानसावर झालेला आहे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून देवेंद्र फडणवीस आणि भाजप टीमने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा हा कार बाजूला त्या पाठोपाठ अजित पवार यांना फोडून डायरेक्ट उपमुख्यमंत्री पद दिले भारतीय जनता पार्टीने ज्या ज्या नेत्यांना भ्रष्टाचारी म्हणून त्यांच्या विरोधात आक्रमक आंदोलने केली न्यायालयीन खटले दाखल केले शेकडो पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सर्व नेत्यांना भारतीय जनता पार्टीने पक्ष घेण्याऐवजी सत्तेमध्ये सहभागी करून त्यांना मोठी पदे दिले ही भारतीय जनता पार्टीची कृती महाराष्ट्रात उलट सुलट चर्चा करते आहे अशा प्रकारची कृती भारतीय जनता पार्टीने केल्यामुळे मूळ भारतीय जनता पार्टीचा मतदार प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाराज झाल्याची चित्र आहे ज्या मतदानाच्या विश्वासावर भारतीय जनता पार्टी आज पर्यंत महाराष्ट्र आणि देशात कार्यरत आहे अशा प्रामाणिक मतदारावर खूप मोठा अन्याय बाहेरील नेत्यांना पक्षांमध्ये घेऊन किंवा सत्तेमध्ये सहभागी करून मोठी पदे दिल्यानंतर निर्माण झाली आहे.
अशा प्रकारची सत्ता स्थापन करण्यापेक्षा सरळ विरोधी पक्षांमध्ये बसलेला भाजप जनतेच्या मनामध्ये स्थान करून आहे परंतु चुकीचे राजकारण करून आणि बदनामीचे षडयंत्र रचून राजकारणामध्ये यश मिळवण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न किती यश देऊन जातो याकडे जाणकारांची आणि महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.
शरद पवार बीडमध्ये जे बोलले त्याचे पडसाद आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात दिसणार आहेत शरद पवार यांच्या अविश्वासाच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर आज आलेल्या नामवृष्टीबद्दल त्यांचे समकालीन सहकारी कुच्छित बुद्धीने हसता आहेत. त्यांनी आजपर्यंत कोणा कोणाला धोके दिली आणि आपला स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून घेतला याविषयी देखील राज्यामध्ये चर्चा होत आहे अनेक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांची स्थान प्रस्थापित करण्यासाठी विशेष कार्यक्रमाची रचना देखील होत आहे या सर्व बदलत्या आणि अस्थिर राजकारणाच्या अनुषंगाने अनेकांना ही राजकारण आवडलेले नाही या काळामध्ये खूप चुकीचे राजकारण सर्वांकडून केले जात आहे या विषयाच्या अनुषंगाने आपण एक जाणकार वाचक म्हणून आपली प्रतिक्रिया वरील मोबाईल क्रमांकावर द्यावी त्याला योग्य आणि चांगली प्रसिद्धी दिली जाईल