शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचा स्वीट टीझर लाँच, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची प्रभावी भूमिका

पुणे दि ५ प्रतिनिधी

‘३ नोव्हेंबररोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटामुळे एका चांगल्या चित्रपटात चे आगमन होत आहे. नवनवीन निर्मित होणारा चित्रपटांमध्ये नवीन संकल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बनवण्यात येणारे चित्रपट मराठी रसिकांना भुरळ घालणारे होत आहेत त्यामध्येच आता शॉर्ट अँड स्वीट या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ती जर मी सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

शुभम प्रोडक्शन प्रस्तुत, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर, रसिका सुनील या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या टीझरवरून कळते की, इतक्या वर्षांनी घरी परतलेला संजू त्याच्या बाबांना भेटण्यासाठी उत्सुक असतानाच, त्यांना भेटल्यावर तो नाराज का झाला, कोण आहेत संजूचे बाबा, नेमके काय कारण असेल ज्यामुळे संजूच्या आईने त्याच्यापासून ही गोष्ट लपवली, हे पाहाण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत. अस ३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक गणेश दिनकर कदम म्हणतात, ” ‘शॉर्ट अँड स्वीट’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून नावाप्रमाणेच स्वीट अशी ही कथा आहे. चित्रपटाच्या टीझरवरून एकंदर चित्रपटाच्या कथेबद्दल अंदाज आलाच असेल. ताकदीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप पाडणारे श्रीधर वाटसर व मालिकेतून घराघरांत पोहोचलेले . हर्षद अतकरी व रसिका सुनील यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांनी उत्तम कामगिरी केली आहे. याचबरोबर यूट्यूबर आणि रील विश्वातील तुषार खैर व कॉमेडी किंग ओमकार भोजणे ही पाहायला मिळतील. मनोरंजनात्मक तसेच संवेदनशील असा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.”

शुभम प्रोडक्शन प्रस्तुत ‘शॉर्ट अँड स्वीट’ ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश दिनकर कदम यांनी केले आहे. पायल गणेश कदम व विनोद राव हे या चित्रपटाचे निर्माते असून स्वप्नील बारस्कर यांचे लेखन असून राहुल जाधव यांचे छायाचित्रण आहे. ३ ऑक्टोबर २०२३ ला ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सर्व भागांमध्ये राहणाऱ्या लोकांनी शॉर्ट अँड स्वीट या चित्रपटाच्या स्वागतासाठी आपली उत्सुकता दाखवली आहे असे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *