संस्कार भारती अल्पकाळात केलेले कार्य स्तुत्य – अशोकराव कुकडे
लातूर दिनांक 13 12 प्रतिनिधी
संस्कार भारती देवगिरी प्रांताची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.10 व 11 जून 2023 रोजी जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ (बु) येथे उत्साहात संपन्न झाली. मराठवाडा आणि खानदेश भागातून 128 प्रांताची प्रतिनिधी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित होते.
दोन दिवसीय वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी जनकल्याण प्रकल्पाचे अध्यक्ष श्री प्रकाश लातूरे, प्रशासकीय अधिकारी श्री.रवी पूर्णपात्रे व प्रांत कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते.त्यावेळी सलग 127 तास नृत्य करून वर्ल्ड रेकॉर्ड करणारी लातूरची कन्या कु.सृष्टी जगताप चा संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यामध्ये डॉ. सौ शुभांगी कुलकर्णी यांनी गायलेले पद्य आणि समारोप कार्यक्रमांमध्ये पसायदान गायनाने कार्यक्रमाची उंची वाढवली. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सादर झालेली सर्वच वैयक्तिक पद्य उपस्थितांची मने जिंकून गेले.
सभेस केंद्रीय कार्यकारणी सदस्य श्री.रवी देव तसेच पश्चिम क्षेत्र प्रमुख श्री.चंद्रकांत घरोटे, देवगिरी प्रांत अध्यक्ष श्री.भरतण्णा लोळगे , प्रांत महामंत्री जगदीश देशमुख, मार्गदर्शक सुधीर कुलकर्णी, प्रांत कोष प्रमुख श्री.मोहन रावतोळे, प्रांत सहमहामंत्री डॉ.देवेंद्र कुलकर्णी हे उपस्थित होते.
बौद्धिक सत्रास संवेदना प्रकल्पाचे श्री.सुरेश पाटील हे उपस्थित होते. समारोप सत्रास जनकल्याण प्रकल्पाचे कार्यवाह श्री. विरभद्र सुगरे, केशवराज विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्री. शैलेश कुलकर्णी संस्कार भारती लातूर जिल्हा अध्यक्षा सौ.मृणालताई कुलकर्णी व स्थानिक समिती संरक्षक डॉ. जयंतीताई आंबेगावकर, स्थानिक समिती अध्यक्षा सौ.मंदाकिनी कुलकर्णी हे उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सत्रास डॉ.मंगेश कुलकर्णी , श्री.उदय पाटील व टिजेएसबी बँकेचे श्री.श्रीनिवास जोशी हे उपस्थित होते, त्या कार्यक्रमासाठी जिल्हा संगीत विधा प्रमुख श्री.शरद पाडे यांच्या मार्गर्शनाखाली सर्व कला साधकांनी उत्तम सादरीकरण केले.सभेच्या पहिल्या सत्राची सुरवात मातृशक्ती प्रमुख.स्नेहल ताई पाठक यांनी केली.
संस्कार भारतीच्या कार्यामध्ये मातृशक्तीची भूमिका यावर त्यांनी मार्गदर्शन केले. विविध जिल्ह्यांचे अहवाल या सत्रात सादर झाले,यात श्रद्धेय पद्मविभूषण कै.बाबा योगेंद्रजी व जेष्ठ कार्यकर्ते रत्नाकर रानडे काका यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मंचावर प्रांत नाट्यविधा प्रमुख सुनिताताई घाटे, प्रांत भुअलंकरण प्रमुख सौ. गिताताई रावतोळे, भुअलंकरण प्रमुख लातूर समिती सौ. अंजली तळीखेडे, व मातृशक्ती सौ.प्रतिमा पटवारी उपस्थित होत्या.
त्या कार्यक्रमाचे आयोजन संस्कार भारती लातूर समिती ने केले होते. जिल्हा संरक्षक डॉ.श्री.राधेश्याम कुलकर्णी,श्री. जनार्धन तळीखेडे, लातूर जिल्हा महामंत्री श्री.धनंजय देशपांडे, जिल्हा कोषप्रमुख श्री.धनंजय पटवारी,जिल्हा सहमहामंत्री श्री. मुकुंद मिरगे ,मार्गदर्शक श्री. संतोष बिडकर, स्थानिक समिती उपाध्यक्ष श्री.जितेंद्र देशमुख या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी काम केले. सभेच्या नियोजनासाठी महाव्यवस्थापक म्हणून श्री.कौस्तुभ जोशी व श्री.हनुमंत पांचाळ यांनी काम पाहिले.
विविध सत्रांचे सूत्रसंचालन व वैयक्तिक पद्य स्मिता कुलकर्णी, निलिमा कुलकर्णी, ज्योतिबा बडे, रघुनाथ पाटील, डॉ.सौ. शुभांगी कुलकर्णी,सौ.रुपाली नाईक, श्री. जनार्दन तळीखेडे श्री.मुकुंद मिरगे यांनी सादर केले. श्री.सोमनाथ पवार, श्री.जयप्रकाश हरिदास,श्री.अनिल जाधव, चि.धन्वंतर देशपांडे, चि.ओमकार कुलकर्णी, चि.चिन्मय पटवारी, कु.श्रध्दा गुरव,कु.यशश्री पाठक,कु.गायत्री धामणगावकर , चि.ओंकार बंडेवार, चि.श्रेयश गुरव,सौ.धनश्री देशपांडे, सौ.मंजुषा देशमुख,कु.देवांगी कुलकर्णी, कु.साक्षी देशमुख, कु.जान्हवी जोशी, चि. अशितोष तळीखेडे, चि.प्रथमेश हरिदास, श्री.मोहन कांबळे,श्री.योगेश बुरांडे, श्री.माधव जोशी,श्री. ज्ञानेश्वर जावळे, श्री.बाळासाहेब पांचाळ,श्री.मार्तंड कुलकर्णी, श्री.राजन सरवदे
यांनी मोलाचे सहकार्य केले.
ध्वनी व्यवस्था श्री.निलेश सोनी यांनी तर लातूर जिल्हा समिती व स्थानिक समिती च्या कला साधकांनी अथक परिश्रम घेतले.
संपादक सतीशजी महामुनी
संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे वृत्त खूप छान व विस्तृत पद्धतीने दिले आहे आपले मनःपूर्वक आभार