जखमी मध्ये जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांचा समावेश
तुळजापूर दि 20 पुढारी वृत्तसेवा
शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आलेल्या शिवसैनिकांचा अपघात झाल्याची बातमी समजतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या सर्व शिवसैनिकांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तुम्ही बरे व्हा… अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सर्व शिवसैनिकांना धीर दिला.
मुंबई येथील शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन झाल्यानंतर परतीचा प्रवास करणारे तुळजापूर तालुक्यातील शिवसैनिकांच्या गाडीला अपघात होऊन पाच जण जखमी झाले आहेत त्यातील एक जण अत्यवस्थ आहे. मुंबई ते तुळजापूर प्रवासादरम्यान सांगवी तालुका तुळजापूर येथे आल्यानंतर हा अपघात झाला आहे. जखमी मध्ये जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांचा समावेश आहे.
युवा सेना विधानसभा प्रमुख खंडू कुंभार कुंभारी, राहुल क्षिरसागर कुंभारी, उपजिल्हाप्रमुख कमलाकर घोडके, शिवसेना जिल्हासहसंपर्क प्रमुख अमर कदम यांचा जखमी मध्ये समावेश आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिंदे गटाच्या शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमासाठी तुळजापूर तालुक्यातील हे शिवसेनेचे पदाधिकारी गेलेले होते कार्यक्रम करून परतीचा प्रवास करताना तुळजापूर जवळील सांगवी येथे ईरटीका वाहन क्रमांक MH13AZ-5336 याचा अचानक अपघात झाला आणि गाडी एका लेन मधून दुसऱ्या लेनमध्ये पलटी खाऊन पडली त्यामुळे सर्वजण जखमी झाले आहेत यामधील एक जण अत्यवस्था असून सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या अपघाताची बातमी मुंबई येथे समजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी चौकशी केली आणि जखमींना चांगले उपचार देण्याच्या सूचना केले आहेत.
जखमी शिवसैनिकांची बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघात कसा झाला याची संपूर्ण माहिती करून घेतली त्यानंतर जखमी असणाऱ्यांची तब्येत कशी आहे याबाबत विचारणा केली व आपण डॉक्टरांना बोलून योग्य उपचार करण्याची सूचना करू आपण कोणती काळजी करू नका शिवसेना पक्ष आपल्या सोबत आहे अशा शब्दात कार्यकर्त्यांना धीर दिला. मुख्यमंत्री महोदय यांचा व्हिडिओ कॉल झाल्यानंतर शिवसेना सहसंपर्कप्रमुख धाराशिव जिल्हा अमरराजे कदम यांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानले आणि शिवसेना हे कुटुंब आहे आणि कुटुंबाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत हेच त्यांनी या निमित्ताने दाखवून दिले आहे असे सांगितले.