दीपावलीच्या शुभमुहूर्तावर तुळजापुरात ११ नोव्हेंबर रोजी सुरमयी दिपावली संगीतमय मैफिल
दीपावली सणाच्या शुभमुहूर्तावर तुळजापूर येथील कलाप्रेमींना रसिकांना दिवाळीची संगीत व मेजवानी ११ नोव्हेंबर २०२३ शनिवार सायंकाळीं ६.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. सर्व संगीत प्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती आहे.
स्वरयात्री संगीत संस्था तुळजापूर, आर्ट ऑफ लिव्हिंग तुळजापूर, संस्कार भारती तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने” सुरमयी दीपावली “* या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तुळजापुरातील *शनिवार संगीत मंडळाचे *ज्येष्ठ गायक सुरेश नाना दीक्षित यांना याच कार्यक्रमात श्रद्धांजली** वाहिली जाणार आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणारी गाणी या कार्यक्रमात स्थानिक कलावंत प्रा. रामलिंग थोरात, बापू गायकवाड, डॉ.आनंद मुळे, संदीप रोकडे, रंगराज पुराणिक, डॉ. सतीश महामुनी, प्रसाद महामुनी, हरी कुलकर्णी, चंद्रकांत जाधव, सौ. शिंदे, यांच्यासह इतर कलावंत आपली गाणी सादर करणार आहेत. प्रा. विवेक कोरे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
तुळजापूर येथील सुमेरू हॉल येथे ११ नोव्हेंबर २०२३ रोज शनिवार सायंकाळीं ६.०० वाजता स्वरयात्री संगीत संस्था तुळजापूर आर्ट ऑफ लिविंग तुळजापूर आणि संस्कार भारती तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या निमित्ताने मराठी सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीताच्या गाण्यांचे सादरीकरण होणार आहे.